आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोन टॅपिंग प्रकरण:रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची शक्यता, राज्याच्या मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला अहवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केल्यानंतर रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढू शकतात.

राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवला आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंग कायद्याचा गैरवापर केला आणि शासनाची दिशाभूल केली असे या अहवालामध्ये म्हटले आहे. मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.

रश्मी शुक्ला यांच्याबाबतचा फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केल्यानंतर रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित होते. यामध्ये रश्मी शुक्लांविषयीच्या अहवालासंदर्भात चर्चा झाल्याचीही शक्यता आहे.

रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याची शक्यता वर्तवली आणि काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती. मात्र यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल केली. तसेच भारतीय टेलिग्राफ अॅक्टखाली परवानगी घेतली असे सकृत दर्शनी निदर्शनास आले असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. या प्रकरणी शुक्ला यांच्याकडून शासनाने स्पष्टीकरणे देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अहवालामधील तपशीलवार माहितीनुसार, यानंतर रश्मी शुक्लांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्यकीश: भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराबाबत दिलगीरी व्यक्त केली. यासोबच कौटुंबिक व्यथा, विशेषत: त्यांच्या पतींचे कॅन्सरच्या आजाराने झालेले निधन आणि त्यांची मुले शिकत असल्याचे बाब त्यांनी निदर्शनास आणली. आपली चूक झाल्याचे कबूल करून त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती देखील केली. मात्र शासनाकडे सादर झालेला अहवाल परत देण्याचा कोणताही प्रघात नसल्याचे तशी कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कुंटे यांच्या अहवालात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...