आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा तिपटीने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एकानंतर एक निर्बंधांचे आदेश जारी केले जात आहेत. आता महाराष्ट्र सरकारने सर्वच महानगरपालिकांना त्यांच्या बंधनकारक तसेच वैधानिक सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईसह राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या दिवेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणातील एकत्रिकरण टाळण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार, मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या बैठका, (बंधनकारक आणि वैधानिक) महासभा, स्थायी समिती व इतर समित्यांच्या बैठका व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून/ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्या.
यासोबतच, एका महिन्यांनंतर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतरच पुढील निर्णय कळविला जाईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुंबईत 10 वी, 12 वी वगळता शाळा बंद
मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जानेवारीपर्यंत या शाळा बंद राहतील. तर 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग खुले राहतील. यासोबतच, लसीकरणासाठी 15 वर्षांपुढील विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.
राज्यात एकाच दिवशी 11 हजार नवे रुग्ण
महाराष्ट्रात एकट्या रविवारी 11,877 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक 7,792 तर ठाण्यातील 617 रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात रविवारी 50 ओमायक्रॉनबाधितांचे निदान झाले. यात 36 ओमायक्रॉन रुग्ण एकट्या पुण्यातील आहेत. पिंपरी-चिंचवड 8, पुणे ग्रामीण 2, सांगली 2, ठाणे 1 आणि मुंबईत 1 ओमायक्रॉनग्रस्त सापडला आहे. 1 नोव्हेंबरपासूनच राज्यात बाहेर देशांतून आलेल्या प्रवाशांचे सर्व्हेक्षण सुरू आहेत. त्यातील 2284 जणांचे नमुणे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.