आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर सुरु होणार शाळा:योग्य ती सर्व खबरदारी घेऊन नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही - मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेऊन राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी दिले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शाळांत क्वाॅरंटाइन सेंटर्स तयार केली होती ती बंद करता येणार नाहीत. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा.

चार तासांची शाळा, एक दिवसाआड वर्ग

> चार तासांची शाळा राहील. त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. बाकी विषयांसाठी आॅनलाइन वर्गांची सुविधा असेल.

> २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळांत विद्यार्थ्यांचे थर्मल चेकिंग करण्यात येईल. एका बेंचवर एका विद्यार्थी.

> एक दिवसाआड वर्ग. विद्यार्थ्यांनी घरूनच जेवण करून यावे. स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी.

बातम्या आणखी आहेत...