आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च न्यायालयाचे आदेश:सरकारी वकिलांच्या परीक्षा मराठीतही घ्या

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सरकारी वकिलांची नेमणूक करताना त्यांच्या परीक्षा मराठी भाषेतही घ्याव्यात असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने दिले.

सरकारी वकील पदाची परीक्षा इंग्रजी भाषेसोबतच मराठीतही घ्यावी, अशी याचिका प्रताप जाधव यांनी केली होती. दंडाधिकारी आणि न्यायाधीशांच्या परीक्षांमध्ये मराठी उत्तरे लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि सरकारी वकिलांच्या परीक्षेसाठी नाही, असे सरकार म्हणू शकत नाही. त्यामुळे यापुढील परीक्षा इंग्रजी भाषेसोबतच मराठीतही घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...