आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन टॅपिंग प्रकरण:मुंबई पोलिसांचे एक पाऊल मागे; म्हणाले तुम्ही नका येऊ, आम्हीच येतो, निवासस्थानीच घेणार फडणवीसांचा जबाब

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणात बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. फडणवीसांना पोलिसांनी उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, आता पोलिसांनीच एक पाऊल मागे घेत फडणवीसांच्या मुंबईतील निवासस्थानी जबाब नोंदविण्याची तयारी सूरू केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या सत्ताकाळात राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्याचा आरोप केला असा आरोप महाविकास आघाडी त्यांच्यावर करत आहे. या प्रकरणात सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना पोलिस ठाण्यात बोलावले. खुद्द ही माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. त्यानंतर भाजपने याबाबत आंदोलनची तयारी सुरु केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी एक पाऊल मागे घेत आता त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वीच एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...