आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळिये भूस्खलन दुर्घटना:दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार, सर्वांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल; मुख्यमंत्र्यांनी तळीये ग्रामस्थांना दिले आश्वासन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच भर पावसात महाडजवळील तळिये गावाची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिले. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी अडीचच्या सुमारास तळीये गावात दाखल झाले होते. मुख्यमंत्री मुंबईवरुन हेलिकॉप्टरने महाडपर्यंत आणि तिथून रस्तेमार्गे तळीये गावात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव सीताराम कुंटे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, या सर्वांनी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली आहे.

धोकादायक गावातील लोकांचे पुनर्वसन करणार
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अशा घटना पावसाळ्यात नेहमी घडतच असल्याचे अनुभव येत आहे. त्यामुळे आदी त्या भागांचे आराखडा तयार करण्यात येईल. जेणेकरुन ऐन पावसाळ्यात या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल असे ते म्हणाले.

काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दुर्घटनेतील प्रत्येक कुटुबांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. तुम्ही फक्त स्वत:ची काळजी घ्या इतर सर्व आमच्यावर सोडा असे मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना धीर देताना सांगितले. कागदपत्राची कोणतीच काळजी करु नका सर्वाना योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

तळियेत आतापर्यंत 40 पेक्षा जास्त मृत्यू
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.

ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त लेाकांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबंधित गावाची पाहणी करणार आहेत. ते गावातील लोकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतील.

सध्या तळिये गावात सुरु असलेले बचावकार्य
सध्या तळिये गावात सुरु असलेले बचावकार्य

मुख्यमंत्र्यांचा असे असेल दौरा
तळिये गावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईहून आज दुपारी 12 वाजता महाडकडे रवाना होतील. मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर महाडमधील एमआयडीसी हॅलिपॅडवर उतरेल. तेथून ते वाहनाने तळिये गावाकडे रवाना होतील. दरम्यान, दुपारी दीड वाजता ते तळिये गावाची पाहणी करत गावातील लोकांशी संवाद साधतील. दुपारी 03:20 मिनटांनी ते परत महाडकडे येत मुंबईला रवाना होतील.

बचाकार्य वेगाने सुरु
एनडीआरएफच्या पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 44 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर ढिगाऱ्याखाली अजून 50 जण अडकल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सदरील घटनेत 35 जण गंभीर जखमी झाले असून त्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितली आहे.

बातम्या आणखी आहेत...