आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालिबान मुंबईवर हल्ला करणार असल्याची धमकी देणारा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मिळाला आहे. हा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने आपण तालिबानी समर्थक असून आपला म्होरक्या सिराजुद्दीन हक्कानीच्या सांगण्यावरून मेल पाठवला असल्याचा दावा केला आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुंबईच्या कार्यालयाला गुरुवारी हा ई-मेल मिळाला. त्यानंतर शहर पोलिस व महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाला (एटीएस) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस तपासण्यात आला. त्यानुसार पाकिस्तानातून हा मेल आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातही अशाच प्रकारचा धमकीचा मेल केंद्रीय तपास संस्थेला मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली, परंतु काहीही पुरावा हाती लागला नाही. कदाचित हा खोडसाळपणाचा प्रकार असू शकतो, असे पोलिसांना वाटते. कारण यापूर्वीदेखील तपास संस्थांना अशा प्रकारचे मेल मिळालेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.