आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. शिरसाट यांचा टोला:अधिकारात तेवढे बोला, शिंदे गटाचा बावनकुळेंना सल्ला ; 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार, तर अवघ्या ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का, असा संतप्त सवाल शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

भाजपच्या मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकांतील जागावाटपासंदर्भात वरील विधान केले. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार संतप्त झाले आहेत. तर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली. अशा वक्तव्यांमुळे युतीत बेबनाव होतो, याची जाणीव बावनकुळे यांनी ठेवायला हवी. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवरील बैठकीत निर्णय घेतला जाईल. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात विधान केले आहे.

बावनकुळे यांनी अधिकारात आहे तेवढेच बोलले पाहिजे, असा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे. भाजप २४० जागा लढवणार आहे. शिंदेंकडे ५० पेक्षा जास्त उमेदवार नाही’ हे भाजप प्रशिक्षण वर्गात केलेले वक्तव्य अंगलट येण्याची चिन्हे दिसताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घूमजाव केले आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला. भाषणातील ठराविक क्लिप तेवढी दाखवण्यात आली अशी सारवासारव केली, असे ते म्हणाले.

बावकुळेंची चित्रफीत हटवली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी मुंबई जिल्हा प्रसिद्धिप्रमुखांच्या बैठकीत जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीत भाजपने शनिवारी आपल्या सर्व समाजमाध्यम खात्यांवरून काढून टाकली आहे.

बातम्या आणखी आहेत...