आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:प्राथमिक शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा हिरवा कंदील, आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८% पर्यंत आले आहे. बालके आजारी पडण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शाळांचे वर्गही सुरू करण्यास आरोग्य विभागाची हरकत नाही. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याबाबाबत बालकांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांची मंगळवारी रात्री ऑनलाइन बैठक पार पडली.

यात सर्व निर्बंध खुले केल्याने प्राथमिक शाळाही सुरू केल्या पाहिजे, अशी भूमिका काही सदस्यांनी मांडली. लहान मुलांचे लसीकरण होईपर्यंत सावध भूमिका घ्यायला हवी, असे मत काहींनी मांडले. मात्र, लहान मुले आता पालकांसोबत बाहेर फिरत आहेत. हॉटेल, बाजारात, मैदान, पार्कमध्ये सर्वत्र लहान मुलांचा वावर सुरू आहे. त्यामुळे प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करणे योग्य होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला. काही अटी- शर्तीवर शहरी भागातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करावेत असे टास्क फोर्सने सुचवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गही सुरू व्हावेत या निष्कर्षापर्यंत आरोग्य विभाग आला आहे.

डिसेंबरात कोरोनाच्या साैम्य लाटेची शक्यता
डिसेंबरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. लस घेऊन काहींना आठ-दहा महिने झाले आहेत. त्यांच्यातील अँटिबॉडीज कमी झालेल्या असू शकतात. लस घेऊनही संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...