आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार विक्रीचा व्यवसाय देशात वाढला:जुलैमध्ये टाटा मोटर्सची ठोक विक्री 57%, मारुतीची 7% वाढली

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून देशात कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. जुलैमध्ये कंपन्यांकडून डीलर्सकडे पोहोचलेल्या कारचे आकडे पाहिल्यास वार्षिक आधारे टाटा मोटर्सने आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७% वृद्धी नोंदवली आहे. टोयोटा किर्लोस्करनेही जुलै २०२१ च्या तुलनेत या वर्षी जुलैमध्ये ५० टक्के कार विकल्या आहेत. तथापि, संख्येच्या हिशेबाने जुलैमध्ये पुन्हा एकदा मारुती सुझुकी डिलर्सना सर्वाधिक कार पोहोचवणारी कंपनी ठरली. तिने ६.८२% च्या वृद्धीसह गेल्या महिन्यात देशांतर्गत डीलर्सना १,४२,८५० कार विकल्या. विशेष म्हणजे मारुतीच्या मिनी आणि कॉम्पॅक्ट कारची विक्रीही वार्षिक आधारे १७ टक्क्यांनी वाढली.

बातम्या आणखी आहेत...