आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:राज्यातील तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार 250 कोटी रुपयांची भरपाई; आज मंत्रिमंडळ बैठकीत येणार प्रस्ताव

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फळबागधारकांना हेक्टरी 50 हजार रुपये

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाणार असून गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली.

मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले की, “७ जिल्हांत परिणाम झाला होता. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार तोक्ते चक्रीवादळात ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण महाराष्ट्र सरकारने २५० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला असून त्यासाठी किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर, निवारेही बांधण्यात येतील.

फळबागधारकांना हेक्टरी ५० हजार रुपये
फळबागधारकांना हेक्टरी ५० हजार रुपये (दोन हेक्टर मर्यादा), सुपारी प्रतिझाड ५० रुपये, नारळ प्रतिझाड ५०० रुपये, प्रतिकटुंब कपड्यांसाठी ५ हजार, भांडी प्रतिकुटुंब ५ हजार रुपये, अंशत: घराची पडझड १५ हजार रुपये, ५० टक्के घर पडझड ५० हजार रुपये, पूर्ण घर नष्ट १ लाख ५० हजार रुपये, अंशत: बोट नुकसान १० हजार, बोट पूर्ण नुकसान २५ हजार रुपये, जाळे ५ हजार रुपये अशी मदत दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...