आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:तौक्ते चक्रीवादळात बुडालेली 'वरप्रदा टग' बोट नौदलाला सापडली, मुंबईपासून 35 किमी पश्चिमेला पाण्याखाली सापडली टग बोट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोधमोहीम अद्याप सूरूच

मुंबई हाय जवळील ‘पी 305' बार्ज आणि 'वरप्रदा टग' बोटीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांची शोध मोहीम अद्याप नौदलाकडून सूरू आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे एकूण 274 कर्मचारी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातले ‘पी 305‘ नौकेवर 261 तर वरप्रदा या टग बोटीवर 13 कर्मचारी होते. यापैकी ‘पी 305‘ बार्ज वरील 186 तर वरप्रदा बोटीवरील 2 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश आले आहे.

आज सकाळी युद्धनौका आयएनएस मकरने वरप्रदा या टग बोटीचा शोध लावला आहे. मुंबईपासून 35 किलोमीटर पश्मिमेला समुद्राच्या तळाशी ही बोट सापडल्याची माहीती नौदलाने दिली आहे. आयएनएस मकरच्या मदतीने बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 70 वर जाऊन पोहचली आहे.

यातले 66 मृतदेह शनिवार पर्यंत तर रविवारी 4 मृतदेह शोधण्यास तटरक्षक दल आणि नौदलाला यश आले आहे. आणखी पाच कर्मचारी बेपत्ता असून त्यांचादेखील शोध घेत असल्याची माहीती नौदलाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...