आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉक:राज्यात टॅक्सी, खासगी बस लवकरच धावणार : परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील वाहनधारकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

राज्यात लवकरच रिक्षा, टॅक्सी तसेेच खाजगी बसेस चालवण्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

मंत्रालयात वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांचेसोबत मंत्री परब यांनी बैठक घेतली. आपला व्यवसाय सुरू करण्यास परनवागी द्यावी, इन्शुरन्सचे हप्त्यांना मुदतवाढ द्यावी अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.

खासगी वाहनांना संमती देताना एसटी आणि विविध पालिकांच्या परिवहन सेवांनासुद्धा द्यावी लागणार आहे. वाहतुक सेवांना जिल्ह्यात की आंतर जिल्हा प्रवासाला मुभा द्यायची, कोरोना संसर्ग प्रादर्भाव होऊ नये यासाठी कोणत्या अटी टाकायच्या यावर काम सुरू आहे. ही सर्व माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल, असे परब म्हणाले. राज्यातील वाहतूक सुविधा पूर्वपदावर आणण्याकरिता तसेच वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

राज्यातील वाहनधारकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

लाॅकडाऊन काळात पोलिसांनी खासगी वाहनधारकांवर मोठ्या संख्येने खटले दाखल केले आहेत, असा आरोप संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सदर खटले तपासून मागे घेण्यात येतील, असे आश्वासन बैठकीत दिले. रिक्षा व टॅक्सीत सध्या एका व्यक्तीला नेण्याची मुभा आहे. ती दोन व्यक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...