आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:गुरुजींनी घेतला सक्तीच्या कोरोना चाचणीचा धसका, उद्यापासून तपासणी, 23 पासून शाळा, 10 लाख चाचण्या कराव्या लागणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून सक्तीच्या तपासणीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राज्यात २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

काेरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. १७ ते २२ नोव्हेंबर २०२० या दरम्यान कोविड-१९ आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. चाचणी केल्याशिवाय शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शाळा सूरू होण्यापूर्वी वर्गखोल्यांचेही निर्जंतुकीकरण सक्तीचे आहे.

10 लाख चाचण्या कराव्या लागणार पहिली ते १२ पर्यंतचे शिक्षक ९ लाख आणि कर्मचारी १ लाख अशा १० लाख कोरोना चाचण्या पुढच्या सहा दिवसांत कराव्या लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...