आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शिक्षकांचे थकीत वेतन लवकरच : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैनंदिन खर्चासाठी शिक्षकांचा संघर्ष

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सोमवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन विधानपरिषद आमदार आणि महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव दत्तात्रय सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना दिले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही ते निवेदन सादर करण्यात आले.राज्यातील घोषित, अघोषित तसेच अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिले. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

दैनंदिन खर्चासाठी शिक्षकांचा संघर्ष

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांतील शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षकांना दैनंदिन खर्चासाठीही संघर्ष करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन शाळांसाठी मंजूर केलेल्या निधीच्या वितरणाबाबत आदेश काढण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या बैठकीला बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, किशोर दराडे आदी शिक्षक आमदार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...