आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शालेय शिक्षण विभाग:शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार एकमुस्त

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

सन २००६ ते २००९ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीची रक्कम एकमुस्त देण्यासंदर्भातला शासन निर्णय बुधवारी शालेय शिक्षण विभागाने बुधवारी जारी केला आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे १ लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. सन २००५ नंतर सेवेत दाखल झालेले हे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यांना निवृत्तिवेतन योजना नाही. त्यामुळे त्यांची भविष्य निर्वाह खाती नाहीत. परिणामी त्यांना रोखीने एकरकमी रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. मान्यताप्राप्त, अंशत अनुदानित, १०० टक्के अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालये यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यासाठी पात्र असतील. ही फरकाची थकबाकी रक्कम रोखीने मिळणार आहे. १ जानेवारी २००६ ते ३१ मार्च २००९ या कालावधीतील ही फरकाची थकबाकी आहे.

1 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ
राज्यातील सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांना या फरकाची रक्कम मिळणार आहे. तसेच ही रक्कम एकरकमी मिळणार आहे. वेतननिश्चितीमधील चुकांमुळे कर्मचाऱ्यास रक्कम अधिक प्राप्त झाल्यास ती शासनाला परत करावी लागेल. त्यासाठी कर्मचाऱ्यास एक हमीपत्र भरुन द्यावे लागणार आहे.