आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकारागृहात 101 दिवस वास्तव्यानंतर आज पीएएलए कोर्टात संजय राऊतांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा राऊतांना नेमके काय झाले हे कळलेच नाही, गोंधळलेली अवस्था असतानाच वकील म्हणाले, तुम्हाला जामीन मिळाला अन्..संजय राऊतांच्या डोळ्यातून आनंदआश्रू तरळले. आता मी पुन्हा लढेल, न्यायदेवतेचे आभार अशी त्यांची प्रतिक्रिया होती.
कोर्टरूमबाहेर कडकडाट
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज दुपारी जामीन मंजूर झाला. राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल कोर्टाने निकाल दिला. सर्वजण काय निकाल येईल याची वाट पाहात होते. खुद्द संजय राऊत हेही याच गोष्टीची वाट पाहत होते पण राऊतांना जामीन मंजूर होताच कोर्टरुमबाहेर टाळ्यांचा कडकडाट झाला. राऊतांना त्यावेळी नेमके काय झाले हे उमगले नाही. काही क्षणातच त्यांच्या वकिलांनी राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर संजय राऊतांच्या डोळ्यातून अश्रू तराळले.
न्याय देवतेचे मानले आभार
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्यांची प्रतिक्रीया फार महत्वाची होती. ते म्हणाले, आता मी पुन्हा लढेन, न्यायदेवतेचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता.
आईसह कुटुंब वाट पाहतेय
संजय राऊतांच्या जामीनावरील सुनावणीवेळी त्यांचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. त्यांना जामीन मिळाल्याचे समजताच कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते. 102 दिवस दुरावलेले संजय राऊत घरी येणार हा मोठा दिलासा कुटुंबाला मिळाला. हा प्रसंग अत्यंत धीरगंभीर पण आनंदाचा होता. राऊतांच्या कुटुंबियांच्याही डोळ्यांच्या कडाही पानावल्या.
स्वागताची जय्यत तयारी
संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याची बातमी मिळताच त्यांच्या आई ते येण्याची वाट पाहत आहेत. घरासमोर आता लगबग सुरू असून राऊत यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. डीजेसह स्वागतासाठीच्या सर्व वस्तूही आणल्या असून त्यांच्या आई अगदी घराच्या वरच्या मजल्यावरील दारात उभे राहून त्या ही सर्व तयारी पाहतानाचे व्हिडीओही समोर आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.