आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील मुजोर वाळू माफियांना रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात खास पोलीस पथक तैनात करण्यात यावे, अन्यथा आम्ही या माफियांच्या अवैध वाळूच्या गाड्या अडवणार नाही, असे स्पष्ट इशारा देत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने गौण खनिज उत्खनन प्रतिबंधाचे काम करण्यास साफ नकार दिला आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने २५ जानेवारी रोजी महसुल विभागास त्यासंदर्भात पत्र पाठवले हाेते. मात्र विभागाने दिड महिना उलटला तरी पत्राची नोंद घेतली नाही. संघटनेने ८ मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अधिवेशन संपताच बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.
२२ मार्चपर्यंत वाट पाहणार
आम्ही २२ मार्चपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, त्यानंतर राज्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार हे आपले काम बंद आंदोलन करतील. आमचे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत कायम राहील, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.