आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:तेलतुंबडे, नवलखांचे एनआयएसमोर आत्मसमर्पण; अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत ‘एनआयए’कडे दिली कोठडी

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • हा संविधानाचा अवमान : मेधा पाटकर

विचारवंत तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आनंद तेलतुंबडे हे मंगळवारी एनआयसमोर स्वत: हजर झाले. अटकेनंतर विशेष कोर्टाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात सोपवले. एल्गार परिषद प्रकरणी तेलतुंबडे यांना कोर्टाने १३ एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. 

दरम्यान, मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी दिल्लीत समर्पण केले. अटकेपासून अंतरिम संरक्षणाची मुदत संपल्यानंतर तेलतुंबडे खंबाला हिल्स येथील एनआयएच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी हजर झाले. यांच्यासोबत पत्नी, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि लोकभारतीचे आमदार कपिल पाटील होते.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेच्या व माओवाद्यांच्या कथित संबंधातील तेलतुंबडे आणि नवलखा हे आरोपी आहेत. पाेलिसांनी यूएपीएअंतर्गत माओवाद्यांशी संबंध आणि सरकार उखडून टाकण्याच्या योजनेखाली गुन्हा दाखल केलेला आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हा गुन्हा दाखल झाला. नवलखा व तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. 

संविधानाचा अवमान : मेधा पाटकर

तेलतुंबडे यांना डाॅ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी अटक केल्याबद्दल लेखक, राजकारणी आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘हा भारतीय संविधानाचा अवमान आहे’ अशी प्रतिक्रिया मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.  

बातम्या आणखी आहेत...