आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान अलर्ट:विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशांपार; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात उन्हाचा चटका आता असह्य होत आहे. विदर्भात तापमानाचा पारा 45 अंशांपार गेल्याने उष्णतेची लाट आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आजदेखील विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मात्र या उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे येथील तापमान 2 ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक आहे. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे तापमान 46 अंशांपार गेले आहे. गोंदिया, वर्धा, जळगाव, अकोला, नागपूर येथेदेखील तापमानाचा पारा 44 अंशांपेक्षा वर आहे. दुसरीकडे पावसाच्या शक्यतेमुळे देशाच्या बहुतांशी भागात उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून आजपासून (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या भागांत उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट)
विदर्भ : अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

आज या भागांत वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड.

या भागांत उष्णतेची लाट,

ब्रह्मपुरी 46.2, चंद्रपूर 46, गोंदिया 44.8, वर्धा 44.8, जळगाव 44.3, अकोला 44.2, नागपूर 44.2, औरंगाबाद 41.4, नांदेड 43.2

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राचे संकेत
बंगालचा उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ उद्या (ता. 4) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे सरकणारी हे वारे तीव्र होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यासह मध्यप्रदेश, तेलंगणाच्या काही भागातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...