आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंद वार्ता:पोलिस शिपाई पदाच्या दहा हजार जागा भरणार, मंत्रिमंडळ बैठकीत सर्वंकष प्रस्ताव मांडण्याचे निर्देश

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भरती प्रक्रिया वर्षभरात पूर्ण करण्यात येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनामुळे राज्यातील पोलिस यंत्रणांवरचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी पोलिस शिपाई पदासाठीच्या दहा हजार जागांवर भरती करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. नागपूर येथील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी या प्रसंगी दिली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली. यानंतर त्यांनी या घोषणा केल्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पोलिस भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल याचा विचार करून सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. 

दरम्यान, बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी उपस्थित होत्या.

आठऐवजी दहा हजार जागा केल्या मंजूर

गृहविभागाकडून पोलिस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून देत एकूण १० हजार पोलिस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

हे प्रश्न अनुत्तरित

>  वर्षभरात म्हणजे कधी हाेणार भरती?

>  नेमकी कोणत्या जिल्ह्यात ही प्रक्रिया घेतली जाणार?

>  कोरोनानंतर भरतीसाठी गाइडलाइन काय असेल?

कोरोनानंतर अडचणी वाढल्या

>  तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव

>  लेखी परीक्षांसाठीची तयारी करताना मार्गदर्शन मिळेना.

अशी हाेते फिजिकल

>  महिला : ८०० मीटर, १०० मीटर धावणे, गाेळाफेक, उंच-लांब उडी

>  पुरुष : १६०० मीटर, १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गाेळाफेक, उंच-लांब उडी

महिला बटालियनसाठी १३८४ पदे : 

नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी १३८४ पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात ४६१ प्रमाणे ३ टप्प्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत. यात शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार आहे.

२४ हजार पदे अद्यापही रिक्त

डिसेंबर २०१९ अखेर राज्याच्या गृह विभागात पदोन्नती व सरळसेवेची एकूण २ लाख ९५ हजार २८० पदे मंजूर होती. पैकी २ लाख ७० हजार ३३० पदे भरण्यात आली होती. तर २४ हजार ८४८ पदे रिक्त आहेत.

लॉकडाऊनमुळे मैदाने उपलब्ध नसल्याने शहरी भागातील तरुणांची अडचण

२२ मार्चनंतर टप्प्याटप्प्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने पोलिस भरतीसाठी रनिंग आणि फिजिकल करणाऱ्या तरुण-तरुणींना असंख्य संंकटांचा सामना करावा लागत आहे. पोलिस भरतीची घोषणा झाली असली तरी अजूनही धावणे आणि कवायतीसाठी मैदानेच उपलब्ध नसल्याने शहरी भागातील तरुणांचा सराव बंद पडला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात रात्री किंवा भल्या पहाटे तरुणांनी धावण्याचा सराव सुरू केला असल्याचे चित्र आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser