आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. तालिबानच्या नावाने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच 'एनआयए'ला ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली असून, त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
तालिबानचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांनी आदेश दिला. त्यानंतर हा मेल पाठवल्याचे धमकी देणाऱ्याने ई-मेलमध्ये म्हटले आहे. मात्र, या इशाऱ्यानंतर मुंबईत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुरक्षा वाढवली
मुंबईतले मंत्रालय, महत्त्वाची कार्यालये, स्टॉक एक्स्चेंज, हॉटेल ताज, सिद्धविनायक मंदिर, बाबूळनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, उच्च न्यायालय, हाजीअली दर्गा, पंचतारांकित हॉटेल आदी ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईवर हल्ले करू, अशा धमक्या सातत्याने येत आहेत. यापूर्वी ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचे 26 मेसेज पाठवले होते. त्याने 26/11 सारखा हल्ला करू असा इशारा दिला होता. पाकिस्तानमधील नंबरवरून ही धमकी आली होती.
शोध केला सुरू
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी हल्ले करू अशा धमक्या दहशतवादी देतात. हे पाहता तपास यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून कडा पहारा सुरू केला आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला आलेल्या ई- मेलनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
तीन महिन्यांपूर्वीही धमकी
तीन महिन्यांपूर्वीही मुंबईवर हल्ला करण्याचा इशारा अतिरेक्यांनी दिला होता. ड्रोन, रिमोट कंट्रोल विमानातून हा हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. महत्त्वाची ठिकाणे, व्हीव्हीआयपी व्यक्ती दहशतवाद्यांच्या निशाणावर असल्याचे समजते. त्यामुळे ड्रोन उडवण्यासही बंदी घालण्यात आली होती...वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.