आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवास्थानाबाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या वृत्तांना दहशतवादी संघटना 'जैश-उल-हिंद' ने चुकीचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये 'जैश उल हिंद' ने एक पोस्टर शेअर केले. यात म्हटले की, 'आम्ही अंबांनींना कधीच धमकी दिली नाही. आमच्याकडून अंबावी कुटुंबाला कुठलाच धोका नाही. मीडियात व्हायरल होणारे पत्र खोटे आहे.'
या पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, ते कधीच कुफ्रकडून पैसे घेत नाहीत. तसेच, ते भारतातील उद्योगपतींच्या वाटेत येणार नाहीत. 28 फेब्रुवारीला बनलेल्या एका टेलीग्राम चॅनेलमध्ये एक चिठ्ठी टाकण्यात आली होती, मुकेस अंबांनी यांना 'जैश-उल-हिंद' संघटनेने धमकी दिली होती.
नवीन पोस्टरमध्ये हे लिहीले
पोस्टरच्या हेडिंगमध्ये लिहीले, 'जैश-उल-हिंद कडून अंबांनी यांना धोका नाही'
'आज सकाळी आम्ही पाहिले की, भारतीय माध्यमांमध्ये "जैश उल हिंद" ने भारतीय उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेतल्याचे वृत्त सुरू होते. आम्हाला जैश उल हिंद नावाच्या एका टेलीग्राम अकाउंटबद्दल माहित पडले, ज्यात हा दावा करण्यात येत होता. या पोस्टरमधून आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, "जैश उल हिंद"चा या घटनेची कुठलाही संबंध नाही. आम्ही खोटे पोस्टर बनवल्यामुळे भारतीय गुप्तचर संस्थांची निंदा करतो. जैश उल हिंद कधीच कुफ्रोकडून पैसे घेत नाही आणि भारतीय व्यापार जगातील टायकुनसोबत कधीच लढाई करणार नाही. आमची लढाई बीजेपी आणि आरएसएसविरोधात आहे. या खोट्या पत्रातून मुस्लिमांना उकसवण्याचा प्रयत्न झाला आहे.'
पोलिसांनी 2000 CCTV फुटेजद्वारे तपास वाढवला
शुक्रवारी सांयकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. ही कार मुकेश अंबानी यांच्या अॅटीलियापासून फक्त 600 मीटर अंतरावर उभी होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि NIA करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त CCTV कॅमेरांचे व्हिडिओ फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून, यातून पुढील तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.