आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याच्या उंबरठ्यावर:पाकिस्तानशी संबंध असलेले 3 दहशतवादी दुबईहून मुंबईत घुसले; पोलिसांना आलेल्या फोनने खळबळ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत तीन दहशतवादी घुसले आहेत, असा फोन पोलिसांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईवर हल्ला करू, अशा धमकीचे फोन येत पोलिसांना येत आहेत.

पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचा तपासही सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईवर हल्ल्याची धमकी देण्यात येत आहे. आता राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीचा मुंबई पोलिसांना एक फोन आला. त्याने दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन दहशतवादी मुंबईत घुसल्याची माहिती पोलिसांना दिली. या दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याची माहितीही त्या व्यक्तीने दिली. त्यामुळे मुंबई पोलिस दक्ष झालेत.

दोन महिन्यांपूर्वीही इशारा

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला दोन महिन्यांपूर्वी चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली होती. इरफान अहमद शेख (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपण इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी असल्याचे सांगितले होते.

पोलिस आहेत दक्ष

विशेष म्हणजे मुंबई विमानतळ, मंत्रालय, बीएसई या महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच कडेकोट असतो. मात्र दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर धार्मिक स्थळांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.