आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर रवींद्र जडेजा (३/२०) आणि अजिंक्य रहाणेने (६१) तुफानी खेळीतून चार वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जला यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध प्रतिष्ठेच्या पहिल्या अल क्लासिकाेमध्ये दणदणीत विजय मिळवून दिला. धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने शनिवारी पाच वेळच्या किताब विजेत्या मुंबई इंडियन्स टीमवर १८.१ षटकांत मात केली. चेन्नई संघाने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह फाॅर्मात असलेल्या चेन्नई संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये दुसरा विजय साजरा करता आला. यादरम्यान चेन्नई संघाच्या अजिंक्य रहाणेने झंझावाती खेळी करताना १९ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले. यासह त्याचे हे यंंदाच्या सत्रातील वेगवान अर्धशतक नाेंद झाले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने घरच्या मैदानावर ८ बाद १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ११ चेंडू आणि ७ विकेट राखून विजयश्री खेचून आणली. यासह मुंबई संघाचा घरच्या मैदानावर पराभव झाला. रहाणेचे ६ चाैकार, ३ षटकारांसह १९ चेंडूंमध्ये अर्धशतक चेन्नई संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी खास टेस्ट स्पेशालिस्ट अजिंक्य रहाणेला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानेही याच विश्वासाला सार्थकी लावताना सत्रातील पहिल्या वेगवान अर्धशतकाची नाेंद आपल्या नावे केली. सलामीवीर काॅन्वे (०) झटपट बाद झाल्यानंतर ऋतुराजसाेबत रहाणेने संघाचा डाव सावरला. यादरम्यान त्याने ६ चाैकार व ३ उत्तंुग षटकारांसह १९ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. हे यंदाच्या सत्रातील वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी बटलर आणि शार्दूलने प्रत्येकी २० चेंडूंत अर्धशतक केेले. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी भागीदारी चेन्नई संघाच्या विजयासाठी रहाणे आणि पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने कंबर कसली. या दाेघांनी मुंबईच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेत अर्धशतकी भागीदारी रचली. यादरम्यान रहाणेने २७ चेंडूंमध्ये ७ चाैकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. त्याचे हे यंदाच्या सत्रातील पहिले अर्धशतक ठरले. तसेच ऋतुराजने ३६ चेंडूंत ४० धावा काढल्या. रायडूने नाबाद २० धावांचे याेगदान दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.