आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भूमिगत रेल्वे चाचणीचा शुभारंभ:कुलाबा सीप्झ मेट्रो-3 ची चाचणी, डिसें.2023 पर्यंत पहिला टप्पा सुरू होणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ कॉरिडॉर (अॅक्वा लाइन) मुंबई मेट्रो-३ च्या पहिल्या भूमिगत रेल्वे चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरे कॉलनीतील सारीपुतनगर येथे मंगळवारी झाला. या वेळी जपान सरकारचे डेप्युटी कौन्सुल जनरल तोशीहिरो कानेको उपस्थित होते. मेट्रो-३ प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेें. २०२३ मध्ये सुरू होऊ शकतो.

मेट्रो लाइन ३ ची वैशिष्ट्ये : -मेट्रो लाइन ३ च्या ट्रेन ८ डब्यांच्या असतील. -एका गाडीतून अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील. -ताशी ८५ किमी वेगामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. -प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रत्येक बाजूस ४ दरवाजे असतील. -स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे ट्रेनचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.

बातम्या आणखी आहेत...