आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार:टीईटी परीक्षा घोटाळा; ईडीकडे जाणार तपास

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या म्हाडा, शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) व आरोग्य विभाग परीक्षा घोटाळ्याचा आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास केला जाणार आहे. आरोग्य विभागाच्या परिक्षेमध्ये गैरप्रकार केला जात असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्यापाठोपाठ म्हाडा व टीईटीमध्येही गैरप्रकार झाल्याचे उघड झाले होते.आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने म्हाडा, आरोग्य व टीईटी प्रकरणाचा शोध घेत तिन्ही क्षेत्रांतील मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...