आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचा हिंदुत्वाचा डोस:दसरा मेळाव्यात ठाकरेंचा घणाघात; देश हुकूमशाहीकडे चालल्याचा आरोप

शिवाजी पार्कवरून अशोक अडसूळ, सचिन वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाहीकडे चालला आहे, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते.

गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र!:शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कसा सुरू झाला; शर्ट-पँट घातलेल्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रावर गारूड केल्याची गोष्ट!

थेट शिवाजी पार्कहून...

- एकाअर्थी झाले, ते बरे झाले. फक्त तुम्ही साथ द्या. पुन्हा सरकार आणून दाखवतो. बरे झाले. बांडगुळे गेले. ती बांडगुळ सेना म्हणा, असे कोणी तरी मला म्हणाले. मात्र, तो बांडगुळ गट आहे. माझ्या मनात विश्वास आहे. ज्या महिषासूर मर्दीनीने महिषासूर मारला. ती महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर रावण दहन करण्यात आले.

- भाजपचे स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवावे. तुम्ही आमच्या पत्रकार परिषद ऐकल्या. आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदा घ्यायचो. कधीही अजित पवारांनी माझ्यासमोरचा माइक ओढला नाही. आम्ही सोबत असताना भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव केले नाही. मात्र, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना ते करून दाखवले. - उद्धव ठाकरे

- बिलकिस बानोवर बलात्कार झाला. तिच्या मुलीचा आपटून खून केला. आरोपी पकडले. शिक्षा भोगत होते. त्यांना गुजरात सरकारने सोडून दिले. मात्र, गावी गेल्यानंतर त्यांचा सत्कार करून स्वागत केले. जी शिकवण शिवरायांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराची खणानारळाने ओटी भरणारे शिवराय. हे शिकवण देणारे आमचे हिंदुत्व आहे. - उद्धव ठाकरे

- देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का? - उद्धव ठाकरे

- काश्मीरमधलीच ती एक घटना आहे. औरंगजेब नावाचा लष्करात एक गनमॅन होता. त्याचे अपहरण करण्यात आले. काही दिवसांनी त्याचे प्रेत आपल्या सैन्याला मिळाले. त्याला हालहाल करून मारले. मुसलमान अतिरेक्यांनी त्याला मारले. तो भारताच्या बाजूने लढतोय म्हणून त्याला मारले. तो औरंगजेब आमचा भाऊ आहे. हे आमचे हिंदुत्व आहे. - उद्धव ठाकरे

- हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आमचे हिंदुत्व जानवे आणि शेंडीशी निगडीत नाही. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले. या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू. - उद्धव ठाकरे.

- पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजराबद्दल आसूया नाही. मात्र, मोठमोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपद योग्य. - उद्धव ठाकरे

- अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत. - उद्धव ठाकरे

- हिंदुत्व हिंदुत्व करत गायी वरती बोलताय ना. मग महागाईवर बोला. ही गायी आठवू द्यायची नाही म्हणून हिंदुत्वाचा डोस. खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रय होसबळे यांनी महागाईची आठवण करून दिली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन - उद्धव ठाकरे

- हिंदुत्व भाजपने शिकवायची गरज नाही. अरे पाकिस्तानात जावून जिनाच्या थडग्यावर डोके टेकवणारी तुमच्या पक्षाची औलाद. पाकिस्तानात जावून तिथल्या पंतप्रधानांच्या वाढदिवासाच केक खाणारा तुमचा नेता. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार. - उद्धव ठाकरे

- माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन, शिवरायांच्या साक्षीने मी सांगतो. माझ्यात आणि अमित शहांमध्ये अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे ठरले होते. मात्र, त्यांना शिवसेना संपवायची आहे. एवढ्यावरच नाही. माणसाची हाव किती असते. तिकीट दिला. उपमुख्यमंत्री केला. आता मुख्यमंत्री केला. त्याला आता शिवसेनाप्रमुख व्हायचेय. ही बाप चोरणारी औलाद. ना स्वतःचे विचार. - उद्धव ठाकरे

- आनंद दिघे आज आठवतायत. मात्र, ते आपल्यात नाहीत. ते बोलू शकणार नाहीत. दिघे एकनिष्ठ होते. ते शेवटी सुद्धा भगव्यात गेले. यावर्षी रावण दहन होणारच, पण तो दहा डोक्यांचा नाही. तर एक्कावन खोक्यांचा बकासूर, धोकासूर आहे. मी आजारी असताना जबादारी सोपलेल्या कटप्पाने धोका दिला. होय गद्दाराच, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत. पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. - उद्धव ठाकरे - शिवाजी पार्कवरले प्रेम ओरबाडून घेता येणार नाही. हे माझ्या शिवसैनिकांचे प्रेम आहे. मला अजूनही डॉक्टरांनी वाकण्याची परवानगी दिली नाही. मात्र, तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जावूच शकत नाही. - उद्धव ठाकरे. - विजया दशमीच्या शुभेच्छा देताना अनेक दसरा मेळावे लक्षात आहेत. मात्र, असा मेळावा अभूतपूर्व. मी भारावून गेलो आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू.

- शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. सारे मैदान तुडूंब भरले आहे. विशेषतः या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.

- काँग्रेसमध्ये दहा वर्षे राहून खासदारकी आणि आमदारकी उपभोगणाऱ्या नारायण राणे यांनी हिंदुत्वावर बोलू नये. किरण पावसकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीचे चॉकलेट घेतले. त्यांनीही हिंदुत्वावर बोलू नये. - सुषमा अंधारे

- उद्धव ठाकरेंना फोन करून गर्दी दाखवा:शहाजीबापू पाटील यांची ठाकरेंवर एकेरी टीका; म्हणाले - भगव्याची शान शिंदेंनी राखली

- हिंदुत्वाला शिंदे गटाने कलंक लावला. हिंदु व्यक्ती संकटात असताना एकमेकांना साथ देतात. तुमच्यासारखे पळून जात नाही. तुमचे दुखणे हे की, मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, पुरोगामी संघटना, अठरापगड जाती आणि मुस्लिम समाजही ठाकरेंसोबत येत असल्याने पायाखालची वाळू सरकली आहे. - सुषमा अंधारे

- प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदेंना चॅलेंज आहे की, भाजप खरी हिंदुत्वाचे समर्थक आहेत ना या दोघांच्या जागा भाजपला द्या. अर्जून खोतकरांची जागाही अंबादास दानवेंना द्या आणि त्याग करा, खरेच शिवसेना वाचवण्यासाठी मिंधे गट जात असतील तर भाजपचे जे. पी. नड्डा शिवसेना संपवण्याची भाषा करीत असतील तर तुम्ही कुठे होता? - सुषमा अंधारे

- मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव भाजपाकडून केला जात आहे. हा भाजपचा मनसुबा महाराष्ट्र आणि मुंबईसाठी धोकादायक आहे. आर्थिक ताकद ही मुंबईत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे लचके तोडून खिळखिळे करण्याचा प्रयत्न आहे. हातातोडांशी आलेला घास गुजरातला गेला. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई पालिकेवर फडकवायलाच हवा. तरच ही मुंबई महाराष्ट्रात ठेवता येईल. मुंबई महाराष्ट्रात हवी असे वाटणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने उद्धव ठाकरेंसोबत राहायला हवे. - सुभाष देसाई

- मुंबई महाराष्ट्रात रहावी वाटत असेल, तर सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

- महाराष्ट्राचे लचके तोडून मुंबईला खिळखिळे बनविण्याचे काम सुरू. फॉक्सकॉन-वेदांता हा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला गेला. स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. सुभाष देसाईंचा इशारा.

- देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याऐवजी नागपूरची चौकशी करावी. आपली बस योजनेला शंभर कोटी देण्याचा घाट घातल्याचा सुभाष देसाईंचा आरोप.

- सध्या लोक सरकारमध्ये बसल्याचा आव आणतायत. मात्र, हे सरकार मराठी भाषेबद्दल उदासीन असल्याचे उच्च न्यायालय म्हणते आहे. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवले आहे. एवढी अवहेलना शिंदे सरकारच्या काळात. हे कुडमुडे सरकार काढून टाका. - सुभाष देसाई.

- उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडी. उद्धव ठाकरेंनी जगाला हेवा वाटावे असे मुख्यमंत्रीपद सांभाळले. सुभाष देसाई यांची टीका.

- शिंदे गटातील आमदारांना मस्ती चढली:अंबादास दानवेंचा घणाघात, म्हणाले - संतोष बांगर धमक्या देतो; सदा सरवणकर गोळ्या झाडतात

- मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील आमदारांना मस्ती चढली आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांची आहे तेच ती बिघडवत आहे. सुर्वे म्हणतात, टेबल जामिन देतो. संतोष बांगर धमक्या देतो. सदा सरवणकर पिस्तूलातून गोळ्या झाडतो पण कारवाई होत नाही, आम्ही जशास तसे उत्तर देणारे आहोत. - अंबादास दानवे

- मी शिवतीर्थावर समोर बसून भाषण ऐकले आज मी व्यासपीठावर संबोधित करतोय ही शिवसेनेची ताकद आहे. सरकार जनतेप्रती असंवेदनशील आहे. ठाकरे सरकारने गतवर्षी अतिवृष्टीनंतर ठाकरे सरकारने भरघोस मदत दिली, पण शिंदे-भाजप सरकारने केवळ तीन हजार चारशे कोटींची घोषणा केली पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही. - अंबादास दानवे

- बुलेट ट्रेनला पैसे मिळतात पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील आमदारांना मस्ती चढली आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांची आहे तेच ती बिघडवत आहे. सुर्वे म्हणतात, टेबल जामान देतो. संतोष बांगर धमक्या देतो. सदा सरवणकर पिस्तूलातून गोळ्या झाडतो पण कारवाई नाही. - अंबादास दानवे

पोलिसांमध्येही हरामखोराची अवलाद पैदा होत असते. एक नवी मुंबईचा डीसीपी शिंदे गटात येण्यासाठी एनकाऊंटर करण्याची धमकी देतो. मी त्यांना इशारा देतो की, आज सत्ता तुमची उद्या आमची असेल लक्षात ठेवा. - अंबादास दानवे

-शिंदेंकडून गर्दी करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न:किशोरी पेडणेकरांची टीका; गद्दारांना शिवसैनिक राजकीयदृष्या संपवणार

शिंदे गटाकडून गर्दीसाठी प्रत्येकी हजार रुपये!:गद्दारांशी काय बरोबरी करायची? शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप

- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील गणेश कांबळे चक्क शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशात शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याला आले होते. त्यांना पाहण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

माढा येथील गणेश कांबळे चक्क दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशात आले.
माढा येथील गणेश कांबळे चक्क दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशात आले.

- शिवाजी पार्कवरील दसऱ्या मेळाव्यात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आतापर्यंत शिवसेनेची एकतर्फी बाजू सांभाळणारे आणि सध्या ईडी कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांची व्यासपीठावर खुर्ची ठेवण्यात आली आहे.

- शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून अनेक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमा झाले आहेत.

शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.
शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

- शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या संघटनेचे अध्यक्ष आहेत केंद्रपाल सिंग माखा हे पंजाबी गृहस्थ. या ठिकाणी अल्पोहार घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य केवळ नैराश्यातून:गद्दाराची परिभाषा त्यांनीच स्पष्ट करावी; जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे सडेतोड प्रत्युत्तर

- आपल्या नेत्याच्या प्रेमाखातर कार्यकर्ते काय करतील याचा नेम नसतो. असेच एक मराठवाड्यातून आलेले लातूरचे अमन सूर्यवंशी यांनी आपल्या दोन्ही गालावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. ते उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी मुंबईत आले आहेत.

मुंबईत दाखल झालेले उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक.
मुंबईत दाखल झालेले उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक.

पलटी मारायला मी संतोष बांगर नाही:आम्ही मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार - खासदार संजय जाधव

- मुंबईत उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवर आणि एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होतोय. मात्र, याचे पडसाद मुंबई बाहेर पडलेत. नाशिक-मुंबई महामार्गावरच्या घोटीजवळ उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाला चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे घोटीजवळ वाहतूक कोंडी झाली होती.

ठाकरे गट आणि शिंदे गटातल्या राड्यामुळे घोटीजवळ वाहतूक कोंडी झाली.
ठाकरे गट आणि शिंदे गटातल्या राड्यामुळे घोटीजवळ वाहतूक कोंडी झाली.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना महिला शिवसैनिकांकडून चोप:आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोप, गाडीतून बाहेर खेचत मारहाण

- शिवाजी पार्कवर होणाऱ्या यंदाच्या दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम शिवसैनिकांनी लावलेली हजेरी. मुस्लीम मावळा संघटनेचे अजिज मोमीन यांनी संगमनेर (जि. अहमदनगर) येथून हजेरी लावत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेना भवनाबाहेर पाठिंबा दिला.

- मुंबई बाहेरून आलेला शिवसैनिक प्रथम शिवसेना भवनला येतो आणि तेथून पुढे मार्गस्थ होतो. शिवसेना भवनाबाहेर मुंबई बाहेरच्या शिवसैनिकांची मोठी गर्दी जमत आहे. शिवसैनिक येथे नाचून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत आहेत. या साऱ्यांना उद्धव ठाकरेंच्या भाषणाची मोठी उत्सुकता आहे.

- कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील शिवसैनिक दादरमधील शिवसेना भवन समोर धडकले. शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत आलेत.

उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेत.
उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेत.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. जालन्यातूनही अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते बीकेसी मैदानावर दाखल झालेत. त्यांनी मंगळवारी उदघाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग कसा काय खुला केला, असा सवाल काँग्रेसचे जालना मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा:उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे यांच्यातील आणखी एक लढाई, ‘किसमें कितना है दम’

नाशिक येथून उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा एक गट आत्ताच मुंबईकडे रवाना झाला. उद्धव साहेब अंगार है, बाकी सब भंगार है...हा बुलंद आवाज कुणाचा शिवसेनेचा. शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देत शिवसैनक मुंबईकडे रवाना झालेत. साधारणतः आत्ता 250 ते 300 शिवसैनिक मेळाव्यासाठी निघाले आहेत.

आता बोला...:भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी दिला होता राजीनामा, नव्या टीझरमधून शिवसेनेचा टोला

निष्ठेपुढे खोकेवाल्यांचा धर्म कसा टिकेल?:जिथे धर्म तिथे जय! शिवसेनेचा भाजप, शिंदे गटावर निशाणा

- गेल्या ५ वर्षांत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुभाष देसाई, रामदास कदम, गुलाबराव पाटील, संजय राऊत, किशोरी पेडणेकर यांची शिवसेना पक्षप्रमुखांशिवाय भाषणे झाली. आता गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यावेळी शिंदे गटाच्या बीकेसीच्या मेळाव्यात यंदा असतील. संजय राऊत तुरुंगात आहेत. सुभाष देसाई आणि किशोरी पेडणेकर मात्र ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात असतील.

शिंदे गट-शिवसेना नेत्यांचा एकाच विमानातून प्रवास:दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाताना विमानात पडली गाठ!

शिवाजी पार्कवरील पोलिस बंदोबस्त

- 2 पोलिस उपायुक्त

- 3 सहाय्यक पोलिस आयुक्त

- 17 पोलिस निरीक्षक

- 60 सहाय्यक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक

- 420 पोलिस कर्मचारी

- 65 पोलिस हवालदार

- 2 RCP प्लॅटून

- 5 सुरक्षा बल पथक

- 2 शीघ्र कृती दल QRT

- 5 मोबाइल वाहने

रामदास कदमांनी व्यक्त केली खंत:उद्धवजी 2 पावले मागे गेले असते, तर 2 मेळावे झाले नसते; आजचे दृश्य मनाला वेदना देणारे

- नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरातून शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी महिलांसाठी आठ बसस करण्यात आल्या आहेत. महिलांची जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहने वाढविण्यात येणार असल्याचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितले.

नाशिकहून उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले.
नाशिकहून उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले.

- नाशिक येथून हजारो कार्यकर्ते मुंबईतल्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी शेकडो कार्यकर्ते पाथर्डी फाटा येथून रवाना झाला. त्यामुळे सकाळपासूनच या भागात वाहतूक कोंडी जाणवायला सुरुवात झाली आहे.

नाशिकहून शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले.
नाशिकहून शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले.

दसरा मेळावा:शिवतीर्थाहून निमंत्रण आले तर तुम्ही जाणार का? खोतकर म्हणाले - शिंदे साहेबांशी बोलावं

- शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 56 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 1966 मध्ये झाला. खरे तर त्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी दसरा होता, पण काही कारणामुळे हा मेळावा मात्र 30 ऑक्टोबरला घेण्यात आला.

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात 'मार्मिक' या नियतकालिकामधून करण्यात आली होती. या मेळाव्या बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मेळाव्याला जवळपास चार लाख लोक उपस्थित होते.

- शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याचा मजकूर 'मार्मिक'मध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, रविवार 30 ऑक्टोबर, सायंकाळी 5:30 वाजता शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा आहे, तोच दसरा मेळावा होय.

- स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबवण्यासाठी प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने या मेळाव्यास जातीने उपस्थित राहिलेच पाहिजे. पिचक्या पाठीच्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊ नये. जय महाराष्ट्र, असे आवाहनही 'मार्मिक'मधून केले होते.

- 'मार्मिक'मध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक व्यंगचित्रही प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यातही असा उल्लेख होता की, अपेक्षाभंग, अन्याय, उपऱ्यांचा धुमाकूळ, पीछेहाट या सर्वांमध्ये बुडणाऱ्या मराठी माणसाला शिवसेना मदतीचा हात देत आहे.

- पहिल्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यासोबत सुभाष देसाईंसह शिवसेनेचे काही मोजके नेते सोबत होते. विशेष म्हणजे या सभेत पांढरा शर्ट-पँट घालून बाळासाहेब आलेले.

- शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्या काळी शिवाजी पार्कच्या भोवताली नारळाची झाडे होती. अतिशय शांत असलेल्या या मैदानावर बाळासाहेबांची तोफ धडाडली. अन् या मेळाव्याने एक इतिहास रचला.

- शिवसेनेच्या या पहिल्या दसऱ्या मेळाव्यातच पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती. मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये स्टीलचा डबा फिरवण्यात आला. मेळाव्याला आलेल्यांनी यथाशक्ती जसे जमेल तसे पैसे या डब्यात टाकले.

- शिवसेनेच्या आजवरच्या 56 वर्षांच्या इतिहासात जवळपास सहा वेळेस दसरा मेळावा झाला नाही. 25 ऑक्टोबर 1974 चा शिवसेनेचा दसरा मेळावा पावसामुळे लवकर संपवावा लागला. 1990 आणि 1992 मध्येही पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला, तर 2006 मध्येही पावसामुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये दसरा मेळावा झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...