आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारने सहा महिने पूर्ण केले आहेत आणि ते स्थिर व बळकट आहेत. मलिक म्हणाले की, हे सरकार थोड्या काळासाठी चालेल असे भाजपने म्हटले होते. मात्र हे सरकार निश्चितच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.
भाजपच्या प्रयत्नांनी सरकार कोसळणार नाही
भाजप महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत बोलत असते असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मात्र यामुळे सरकार कोसळणार नसल्याचे मलिक म्हणाले. भाजप खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. ठाकरे सरकार कोविड -19 साथीच्या रोगाचा सामना करण्यास अपयशी ठरल्याबद्दल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राणे यांनी केली होती.
तिन्ही पक्ष एकत्र होऊन निर्णय घेतात
नवाब मलिक म्हणाले की, 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' अंतर्गत हे सरकार स्थापन करण्यात आले होते, ज्याचा मसुदा तीन पक्षांनी तयार केला होता आणि तीन पक्ष एकत्र काम करत आहेत. ते म्हणाले, सरकार सध्या कोरोनाविरोधात लढत आहे. आम्ही यावर मात करू आणि सरकार योग्यप्रकारे चालवू. भाजपचा दीर्घकालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सहकार्याने गतवर्षी सरकार स्थापन केले होते.
सरकारने आज 6 महिने पूर्ण केले
महाविकास आघाडी सरकारला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी देखील शपथ घेतली होती. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश होता. काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.