आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानधनात वाढ:कोरोनाविरोधतील लढाईत ठाकरे सरकारचे बळ, बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरेंनी ट्वीटरवरुन दिली माहिती

बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. कोरोना विरोधातील लढाईला यामुळे बळ मिळेल, आणि कोरोना वॉरिअर्स असलेल्या डॉक्टरांनाही यामुळे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार मानधन मिळेल. तसेच, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार मिळतील. याशिवाय, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार आणि इतर भागातील  विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन  देण्यात येईल. राज्याचे पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...