आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0:ठाकरे सरकारने 15 कंपन्यांसोबत केला 34 हजार कोटींचा करार, 23 हजार 182 लोकांना मिळेल रोजगार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूके, स्पेन, जपान, सिंगापूर आदी देशांतील उद्योजकांनी केले करार : उद्योग मंत्री

कोरोनाचे मळभ बाजूला सारून महाराष्ट्र पुन्हा गुंतवणुकीचा प्रवाह वाढवण्याकडे वाटचाल करत आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर (एमओयू) स्वाक्षऱ्या झाल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या वेळी राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले, केमिकल, डेटासह लाॅजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांतील उद्योग गुंतवणुकीस उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरबाबतही महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास आहे. कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

६०% उद्योगांचे भूसंपादन पूर्ण

गुंतवणूकदार व राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत भूसंपादन आदी प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. कोरोनाकाळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. उद्योग खात्याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टार्गेट एक लाख कोटी

मुख्यमंत्री म्हणाले, ही सुरुवात आहे. सुमारे ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीतून बाहेर पडून सामर्थ्याने आघाडी घेईल.

राज्याला प्राधान्य : देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, यूके, स्पेन, जपान, सिंगापूर आदी देशांतील उद्योजकांनी करार केले. राज्यात डेटा सेंटर, लाॅजिस्टिक पार्क, मॅनिफॅक्चर गुंतवणूकदारांना आवश्यक वातावरण उपलब्ध आहे.

औरंगाबाद-जालन्याला संधी

गतवर्षी जुलै महिन्यात एमआयडीसीने औरंगाबाद-जालन्यासह राज्यात ६ ठिकाणी लाॅजिस्टिक्स हब उभारण्याची घाेषणा केली हाेती. त्यामुळे नव्या करारांत आैरंगाबादेत प्रकल्प येण्याची संधी आहे.