आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Thackeray Government Published Booklet On Completed One Year : If There Is A Political Crisis, We Will Break It, Chief Minister Thackeray Warns BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तिकेचे प्रकाशन:मला मुख्यमंत्री बनवणे म्हणजे पॅव्हेलियनमध्ये क्रिकेट पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकाला मैदानावर क्रिकेट खेळायला पाठवणे होते - उद्धव ठाकरे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकीय संकट आणाल तर मोडून काढू, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला इशारा

महाराष्ट्र घाबरत नाही, कधी घाबरला नाही, असे निक्षून सांगत “महाराष्ट्रावर कोणी राजकीय संकट आणू पाहत असेल तर ते हिमतीने मोडून काढले जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्राला दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वर्षपूर्तिनिमित्त ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ पुस्तिकेचे प्रकाशन झाले, त्या वेळी उद्धव बोलत होते.

ठाकरे म्हणाले, मला मुख्यमंत्री बनवणे म्हणजे पॅव्हेलियनमध्ये क्रिकेट पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकाला मैदानावर क्रिकेट खेळायला पाठवणे होते. पण, जनतेचे आशीर्वाद आणि दोन्ही पक्षांचे सहकार्य यामुळे सरकारचे वर्ष उत्तम गेले. नैसर्गिक आपत्तीत सुद्धा राजकारण होणे मात्र क्लेशकारक होते, असा खेद त्यांनी भाजपचे नाव न घेता व्यक्त केला. कोरोना महामारी, नैसर्गिक संकटे यांना नव्या सरकारला तोंड द्यावे लागले. तीन पक्षांचे सरकार असूनही आम्ही कधी खोटा लपंडाव खेळलो नाही. सहकाऱ्यांनी कधी अडेलतट्टूपणा, मानमरातबासाठी अट्टहास याचे प्रदर्शन घडवले नाही. सगळे मंत्री छान काम करतात, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी भाजप, केंद्र सरकार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटे घेतले. माझा माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. त्यामुळे मला फोन टॅप करायची गरज नाही. जो तरंगतो तो तरंगत तरंगत कुठेही जातो, असा टोमणा त्यांनी विरोधकांना लगावला. शरद पवार म्हणजे अनुभवाचे पुस्तक आहे. सरकार चालवण्याचे त्यांचे अनुभव नेहमी सांगत असतात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी फोनवर बोलणे होते. ‘हमारे लोग सताते नहीं ना’ असे त्या विचारत असतात, असे उद्धव म्हणाले.

...तोपर्यंत सरकारला धोका नाही : अजित पवार

सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे जोपर्यंत एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला धोका नाही, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्यपाल नामनियुक्तच्या १२ रिक्त जागांचा निर्णय राज्यपालांनी लवकर घ्यावा, असे ते म्हणाले. वर्षपूर्तीचा क्षण ऐतिहासिक असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात म्हणाले.

शरद पवार यांच्याकडून राजशिष्टाचाराचे पालन

राजशिष्टाचाराप्रमाणे मुख्यमंत्री शेवटी भाषण करतात. कार्यक्रम पत्रिकेत फाटा देत तो मान शरद पवार यांना दिला होता. मात्र, पवार मुख्यमंत्र्यांच्या पूर्वी भाषणास उठले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, पवार यांनी राजशिष्टाचाराचे पालन करत मुख्यमंत्र्यांनाच शेवटच्या भाषणाचा मान दिला.

राज्य सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ : पवार

तीन पक्षांचे आघाडी सरकार जगन्नाथाचा रथ आहे, तो पुढे नेण्यात सर्वांचे योगदान असल्याचे शरद पवार म्हणाले. केंद्र सरकारविरोधात शेतकरी दिल्लीत उपोषणाला बसला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी यांनी उत्तम काम केल्याने अशी परिस्थिती उद्भवली नाही, असे प्रशस्तिपत्र पवार यांनी दिले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser