आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर घोषणा झाली:अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित, मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच पुरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या व पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा पॅकेज जाहीर करण्यात आहे आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, जिरायतीसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रतिहेक्टर 15 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे जिरायतीसाठी केंद्राकडून 6,800 रुपयांच्या मदतीचे निकष असले तरी राज्याने यासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...