आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा तर होणारच:वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले, राष्ट्रवादीत लोक बॅगा भरून तयारच होते; ठाकरे गटाचा थेट आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला, अशाप्रकारची थेट टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे.

63 वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले 83 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मागच्या आठवड्यात राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते व लोकभावना पाहून त्यांनी निवृत्तीची घोषणा मागे घेतली. मात्र यी संपूर्ण नाट्यावर सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.

पक्षाचा शेंडा-बुडखा महाराष्ट्रातच

सामनात म्हटले आहे की, पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.

नाटय़ावर पडदा पडला

सामनात म्हटले आहे की, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला आहे.

पक्ष बुंध्यापासून हादरला

सामनात पुढे म्हटले आहे, पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.

'लॉजिंग-बोर्डिंग'ची व्यवस्था

सामनात म्हटले आहे, भाजपाची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. लोक बॅगा भरून तयारच होते आणि येणाऱ्यांच्या 'लॉजिंग-बोर्डिंग'ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांच्या खेळीने भाजपाचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला आणि त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता. पवारांनी ते करण्यास नकार दिला.