आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षपातीपणाचा आरोप:'रोशनी शिंदे मारहाण प्रकरण', आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांची सशर्त परवानगी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणावरुन आता ठाकरे गट मोर्चा आणि सभा काढणार आहे. त्यांच्या या सभेला आणि मोर्चाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.

आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत ठाण्यातील कासारवडवली परिसरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर रोशनी शिंदे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची लेखी तक्रार देखील दाखल केली होती. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलिसांकडून याप्रकरणी पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून आज दुपारी 3 वाजता ठाण्यातून मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

या आहेत अटी

पोलिसांनी या मोर्चाला अटी आणि शर्थींसह परवानगी दिली आहे. मोर्चा हा वेळेत संपवण्यात यावा, शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न सभा पार पाडावी, मोर्चा दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शित करू नये, कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करू नये, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करु नये या अटी ठेवण्यात आल्या आहेत.

यांची असेल उपस्थिती

मोर्चानंतर ठाण्यातील शक्तीस्थळवर महाविकास आघाडीचे छोटीशी सभा देखील होणार आहे. या सभेचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. तर यावेळी सुनील राऊत, राजन विचारे, केदार दिघे तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण सोबत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.