आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:ठाकरेंनी घेतली रात्री 2 ला बैठक; त्यानंतर अलर्ट, रात्री 9.30 वाजता शिंदे नाॅट रिचेबल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर आमदार हॉटेलवर पोहोचताच ‘वर्षा’वर खशिवसेनेचे नाराज ३५ बंडखोर सुरतला ला मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले अन् इकडे वर्षा निवासस्थानी त्यांच्या बंडाची वार्ता कळली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री २ वाजता वर्षा येथे शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यानंतर मुंबईत दिवसभर मोठ्या राजकीय हालचाली घडल्या.

विधान परिषदेचा पहिला निकाल सोमवारी रात्री ९.३० वाजता जाहीर झाला. मात्र, त्या वेळी एकही शिवसेना नेता प्रतिक्रिया देण्यास उपस्थित नव्हता. शिंदे यांच्या नाराजीची कल्पना सेनेच्या वर्तुळात होती. त्यामुळे सोमवारी दिवसभर सेनेत सन्नाटा होता. सोमवारी दुपारी ३ वाजता विधिमंडळातून बाहेर पडलेले बंडखोर थेट सुरत ऑपरेशनच्या कामाला लागले. रात्री ९.३० वाजता शिंदे नाॅट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर खातरजमा करण्यात वेळ गेला. तोपर्यंत रात्री दीड वाजता शिंदे यांच्यासह ३५ आमदार सुरतला पोहोचले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील हालचालीला मोठा वेग आल्याचे पहायला मिळाले. रात्री मविआच्या नेत्यांची बैठक झाली. यातही चर्चा झाली.