आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्धिपत्रक:भाजपविरोधी आघाडीसाठी सिब्बलांना ठाकरेंचा पाठिंबा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपविरोधात आघाडी करण्याचे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. सिब्बल यांच्या आवाहनाला पाठिंबा असून देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सिब्बल यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शनिवारी (ता.४) प्रसिद्धिपत्रक काढून उद्धव ठाकरे यांनी आपला पाठिंबा सिब्बल यांना जाहीर केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शनिवारी न्यायव्यवस्था आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचे आवाहन केले होते. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी सिब्बल यांचे समर्थन करणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असेही ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...