आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चक्क हात जोडत “जाऊ द्या’ असे उत्तर दिले. ‘हा कहर आहे. मातोश्रीतून बाहेर ते येत नाहीत. विधिमंडळात न येता ते पंतप्रधान काय बनणार? ही या पदाची चेष्टा आहे. हात वर केला की खाली आणायला ३ मिनिटे लागतात,’ असा टोला लगावत राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला. राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी स्वतःची जीभ सांभाळावी. ते असे फिरत राहिले तर तीही जागेवर राहणार नाही. फिरवाफिरवी सुरू आहे. संजय राऊत यांनी आता कसे फिरवले, मी असे बोललोच नाही म्हणतात. ठाकरे यांचा आता विषय संपला, दुकान बंद झाले. आता महाराष्ट्रातून लवकरच लाॅकआऊट होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, राणे हे नेहमीच काहीही बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे ठाकरे गटाने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.