आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप देशपांडेंची उद्धवांवर टीका:ठाकरे भाजपला सोडून मनसेशी लग्न करतो म्हणाले; पण त्यांनी खंजीर खुपसला ती त्यांची जुनी सवयच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहाल शब्दात टीका केली. उद्धव ठाकरेंनी आमच्याही पाठीत खंजीर खूपसला असा दावा करीत ठाकरेंची खंजीर खूपसण्याची सवय जूनीच आहे असा घणाघात त्यांनी केला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले देशपांडे?

संदीप देशपांडे म्हणाले की, 2017 साली आम्हाला मातोश्रीवर बोलावून घेतले. त्यावेळी आम्हाला म्हणाले, की, आपण एकत्र निवडणूक लढवू, त्यावेळी आमच्याशी त्यांनी बोलणी केली. हेही त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षासोबत आम्ही लग्न मोडतोय. त्यानंतर आपण नविन लग्न करू.

आम्हालाही दगा दिला

संदीप देशपांडेंनी दावा केला की, एकीकडे ठाकरेंनी आम्हाला मातोश्रीवर बोलावले, चर्चा केली त्यानंतर मात्र आमच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खूपसला. ठाकरेंची खंजीर खूपसण्याची जूनीच सवय आहे.

भाषण म्हणजे नळावरील भांडणे

संदीप देशपांडे यांनी टीका केली की, शिवतीर्थावर विचारांचं सोने लुटायला मिळण्याऐवजी नळावरची भांडणे आणि उणीदुणी बघायला मिळाली. बादली पुढे सरकवण्यावरून भांडणे दसरा मेळाव्यात दिसून आली. दोघाही एकमेकांना शिव्या घालण्यासाठी मेळाव्याचा उपयोग करुन घेतला. विकासावर तर सोडा पण जूनेच मुद्दे त्यातही गद्दार, खंजीर, खोके याव्यतिरिक्त भाषणात काहीच नव्हते.

बातम्या आणखी आहेत...