आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mahavikas Agahdi | Thackeray's Readiness To Resign If Some MLAs Are Unhappy, While The Number Of MLAs In Shinde's Constituency Increased

ठाकरेंची राजीनाम्याची तयारी:शिंदेंच्या गाेटात आमदारांची संख्या वाढली; आघाडी बहुमत सिद्ध करेल, राऊतांचा दावा

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या शिवसेनेतील बंडाळी नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांचे पाठबळ मिळवल्यानंतर आता पक्ष वाचवण्याचे ठाकरेंसमाेर आव्हान असेल. म्हणूनच ‘एकही आमदार किंवा शिवसैनिक नाराज असेल तर मुख्यमंत्रिपदच काय, पक्षप्रमुखपद सोडण्यासही आपण तयार आहोत, फक्त त्यांनी समोर येऊन तसे सांगावे,’ असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी बुधवारी ऑनलाइन संवादातून केले. जनतेशी संवाद साधून आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दुसरीकडे, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, आघाडी बहुमत सिद्ध करेल, असा दावा केल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम राहिला.

‘बाळासाहेबांची शिवसेना आज राहिली नाही,’ हा आरोप फेटाळताना उद्धव म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर २०१४ मध्ये स्वबळावर लढलो, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ६३ आमदार निवडून आणले. त्यानंतर बाळासाहेबांच्या काळातील अनेक शिवसैनिकांना याच शिवसेनेमुळे पदे मिळाली,’ याची आठवण त्यांनी करून दिली. हिंदुत्वाला तिलांजली देत सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, असा आरोप भाजप व शिंदे करतात. तो खोडून काढताना उद्धव म्हणाले, ‘हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. आदित्य हे एकनाथ शिंदे व इतर नेत्यांसह अयोध्येला जाऊन आले, ते हिंदुत्वासाठीच’ अशी आठवण त्यांनी करून दिली.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ : शरद पवार, सोनिया गांधी यांनी विश्वास टाकल्यामुळे मी मुख्यमंत्रिपद स्वीकारले. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांना दिलेले वचन मी पूर्ण करू शकलो. मात्र काही लोक शिवसेनेच्या लाकडाचा दांडा वापरून आपल्याच पक्षावर घाव घालत आहेत, ते मला नकोय. म्हणूनच शिवसेनेचा एक जरी आमदार म्हणत असेल की मी मुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे, तर मी ही दोन्ही पदे सोडण्यास तयार आहे. फक्त त्यांनी समाेर येऊन बोलावे. मी त्यांना अजूनही आपले मानतो, त्यांनीही मनात जे आहे ते स्पष्ट बोलावे. अजूनही कोणी शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी पद सोडण्यास तयार आहे, असा पुनरुच्चारही ठाकरेंनी केला. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते, मात्र माझ्यासाठी सत्ता व संख्या गौण आहे. जनतेचे प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हे प्रेम कायम ठेवा, असे आवाहनही त्यांनी जनतेला व शिवसैनिकांना केले.

एकनाथ शिंदेंसाेबत ४५ आमदारांचे बळ
उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या शिवसेना व मित्रपक्षातील आमदार माेठ्या संख्येने एकनाथ शिंदेंकडे जात आहेत. ठाकरेंचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह चार आमदार बुधवारी गुवाहाटीत दाखल झाले आहेत, तर अन्य सहा जण गुरुवारी सकाळी विशेष विमानाने सुरतहून जाणार आहेत. शिंदेंकडे आता ४५ पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ झाले.

दिव्य मराठी एक्सपर्ट ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा ‘व्हीप’ चालणार
शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेंची? तांत्रिक पेच, विधानसभा अध्यक्षांकडे होणार फैसला

प्रतिनिधी | मुंबई
पक्षनेतृत्वाविरोधात बंड उभारलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे २९ आमदार आहेत. आणखीही काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेच्या ३७ आमदारांचा स्वतंत्र गट करण्यात शिंदेंना यश आले तर त्यांना ठाकरेंनी नेमलेल्या प्रतोदांचा व्हीप (पक्षादेश) लागू हाेणार नाही. मात्र बंडखोरांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच पक्षादेश झुगारल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा डाव शिवसेनेने आखला आहे. या तांत्रिक खेळात शिवसेना कोणाची? याचा फैसला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने होणार आहे. त्यावरच ठाकरे सरकारचे भवितव्यही अवलंबून असेल.

१९८५ च्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या दोन तृतीयांश (६६ टक्के) आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला तरी त्यांच्या आमदारकीला धोका उद‌्भवत नाही. त्यापेक्षा कमी असेल तर मात्र पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करू शकतो. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत.

पुढे काय ? बहुमतासाठी चुरस वाढणार बंडखोर आमदार आपल्याकडील संख्याबळाची यादी राज्यपालांना भेटून देतील. ठाकरे सरकारला आमचा पाठिंबा नाही, असा दावा करतील. बंडखोर गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे का? याची खातरजमा राज्यपाल करतील. त्यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देतील. त्यासाठी विशेष अधिवेशन घेण्यासाठी अवधी देतील.

दिव्य मराठी इनसाइट
तीन वक्तव्यांवरून जाणून घ्या राज्यात काय हाेणार? बंडासाठी शिंदेंचा महाराष्ट्र हिताचा हवाला

उद्धव ठाकरे सरकारला राजीनाम्याशिवाय पर्याय नाही उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे, बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगत शिंदेंनी संभ्रम दूर केला.

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अखेरपर्यंत निकराची झुंज
एकनाथ शिंदेंकडे ४० ते ४५ आमदार गेल्याने ठाकरे सरकार पायउतार होणार हे जवळपास निश्चित झाले. उद्धव ठाकरेंनीही स्वत: राजीनाम्याचे संकेत दिले. मात्र त्यानंतरही लढण्याची तयारी दर्शवत राऊत यांनी शिवसैनिकांत जोश कायम ठेवला.

बातम्या आणखी आहेत...