आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यासपीठावर एकत्र:उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांना साद; मुंबई निवडणुकीत युतीचे संकेत

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. केंद्राच्या गुलामीत राज्य नाही. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. सगळे मलाच पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे, असा आरोप करत ‘सत्तापिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक -अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना युती करण्यासंदर्भात ठाकरे यांनी या कार्यक्रमात साद घातली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवशक्ती व भीमशक्ती पुन्हा एकत्र येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा रविवारी (ता.२०) दादरमधील शिवाजी मंदिरात लोकार्पण सोहळा पार पडला या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आबंडेकर, शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे संपादक सचिन परब आदी उपस्थित होते.

...तर आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी या वेळी अड. आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली. “प्रकाशजी, आता आपण एकत्र आलो आहोत, आतापर्यंत बाबासाहेब आणि बाळासाहेब यांच्या फोटोंना अभिवादन करायचो. आता दोन नातू एकत्र आले आहेत. कुटुंब एकत्र आले आहे. आपल्या दोघांचेही वैचारिक व्यासपीठ एकच आहे. दोन्ही विचारांचे वारसे घेऊन आपण पुढे चाललो आहोत. जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला आजोबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...