आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुषमा अंधारेंचे डोळे पाणावले. संजय राऊत यांच्या जामिनामुळे आम्हाला हजार हत्तीचे बळ मिळाले. आम्ही अत्यंत आनंदी आहोत, असे म्हणताना सुषमा अंधारे भावूक झाल्या.
तसेच, ठाकरेंची तोफ समजले जाणारे संजय राऊत लवकरच तुरुंगाबाहेर येतील. आता जलवा पाहा, असा इशाराही अंधारे यांनी विरोधकांना दिला. याशिवाय संजय राऊत यांना जामीन मिळताच टायगर इज बॅक असे ट्विटही अंधारे यांनी केले.
मला अपशकुनी म्हटले गेले
'टीव्ही 9' या वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे खूप आनंदी आहोत. राऊत तुरुंगात गेल्यानंतर, त्यांच्या गैरहजेरीत माझा ठाकरे गटात प्रवेश झाला. त्यामुळे राऊतांची आणि माझी भेट होऊ शकली नाही. भाजपने तर मी अपशकुनी आहे, माझ्या येण्यामुळेच राऊत तुरुंगात गेले, या पातळीवर टीका केली. त्यामुळे संजय राऊतांचे आता बाहेर येणे. त्यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना विजय मिळणे, हे व्यकिगतरित्या माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हे सांगताना सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
विरोधकांना इशारा
सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय राऊत तुरुंगाबाहेर येतील तेव्हा महाप्रबोधन यात्रा सोडून मी त्यांच्या स्वागतासाठी मुंबईला जाणार आहे. राऊतांच्या बाहेर येण्यामुळे आम्हाला फार शक्ती मिळाली आहे. आता पुढे पहा काय जलवा होतो, असा इशाराच सुषमा अंधारेंनी विरोधकांना दिला.
आमच्यासाठी आज दिवाळी
राऊत तुरुंगातून बाहेर आल्यास तुम्ही महाप्रबोधन यात्रेत एकत्र दिसणार का, असा प्रश्न सुषमा अंधारे यांना विचारण्यात आला. त्यावर अंधारे यांनी म्हटले की, महाप्रबोधन यात्रेत त्यांच्यासोबत असणे हा माझ्यासाठी मान असेल. त्यांच्या अनुपस्थितीत मी खारीचा वाटा म्हणून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली होती. संजय राऊतांना जामीन मिळाल्यामुळे आज आमच्यासाठी दिवाळीचा दिवस आहे. आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे.
काही जण पूर्वी रिक्षा चालवत होते
सुषमा अंधारे म्हणाल्या, जे ४० लोक गेले, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, त्यापैकी काहीजण पूर्वी रिक्षा चालवत होते, फुलं विकत होते, टपरी चालवत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी या लोकांना गावखेड्यातून आणून वर्षा आणि सह्याद्रीवर बसवले. या लोकांनी कठीण काळात धीर बाळगणे अपेक्षित होते. संजय राऊत यांच्या आदरापोटी आमच्या डोळ्यात आज अश्रू येत आहेत, तशी हिंमत ४० लोकांनी दाखवली असती तर आमच्या मनात त्यांच्याविषयी हीच भावना असती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.