आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे सरकार 2 महिन्यांत पडणार:केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनीही मध्यावधीचे संकेत दिले आहेत, खासदार संजय राऊतांचा टोला

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरे बोलून जातात. त्यामुळेच त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर बोलताना कधी काय होईल याचा नेम नाही, असे बोलून मध्यावधीचे संकेत दिले आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीच आता येत्या दोन महिन्यांत राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत. माझ्या मनात तर हे शिंदे सरकार लवकरच पडणार, याबद्दल तिळमात्र शंका नाही. तसेच, याबाबतची काही महत्त्वाची माहितीही माझ्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

काय म्हणाले होते दानवे?

काल कन्नड येथील सभेत रावसाहेब दानवे म्हणाले होते की, 'महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.' रावसाहेब दानवेंच्या याच वक्त्यावरुन खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

सुटकेनंतर राऊत प्रथमच दिल्लीत

दरम्यान, तुरुंगातून सुटल्यानंतर खासदार संजय राऊत आज प्रथमच दिल्लीत आले. पक्षाच्या तसेच इतर काही कामांसाठी आपण दिल्लीत आलो आहेत, असे सांगून त्यांनी आज पत्रकार परिषदेत नेहमीच्या शैलीत शिंदे सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला, तरुणाई या यात्रेकडे आशेने पाहत आहे. सध्या यात्रा गुजरातला आहे. माझीही यात्रेत सहभागी होण्याची इच्छा आहे. पक्षप्रमुखांशी परवानगी घेऊन लवकरच या यात्रेत सहभागी होणार आहे.

आंबेडकरांसोबत युती देशासाठी आदर्श

उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साद घातली आहे. त्यावर राऊत म्हणाले, केवळ मुंबई पालिकेसाठी नव्हे तर संपूर्ण राज्य, देशपातळीवर ही युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. सध्या देशात जी काही हुकुमशाही सुरू आहे, त्याविरोधात अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर उभे राहिल्यास उद्धव ठाकरे त्यांना नक्कीच पाठींबा देतील. संपूर्ण महाराष्ट्र, देशासाठी आदर्श असा हा फॉर्म्युला असेल. युती व्हावी, यासाठी सकारात्मक पाऊल पडत आहे.

शिंदेंनी क्लिप जाहीर करावी

सीमाप्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समिती गठीत केली आहे. तसेच, या मुद्द्यावर आपण लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. त्यावर टीका करताना राऊत म्हणाले, आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी कधी बेळगावला भेट देऊन तेथील नागरिक काय सहन करत आहेत, हे पाहिले आहे का? आता पंतप्रधानांना भेटून काय बोलणार आहात? त्यांना काय जाब विचारणार आहात? हिंमत असेल तर शिंदेंनी मोदींसोबत काय चर्चा केली याची क्लिप जाहीर करावी, असे आव्हान राऊतांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...