आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2020 मध्ये देशात एका भयावह विषाणुने प्रवेश केला. कोरोना अस त्या विषाणुनेचे नाव. या विषाणुमुळे देशातले अनेक लोक मारले गेले. या विषाणुने तब्बल दोन वर्ष देशात थैमान घातले. याचबरोवर कोरोना नंतर नव-नवीन व्हायरसने देशात शिरकाव केले. अशातच आता XE व्हेरिएंट व्हायरसने डोके वर काढले आहे. व याची दहशत आता सगळीकडे पसरली आहे. या व्हेरिएंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ परिसरात व्हेरिएंटचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की, या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. याआधी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या या सब व्हेरिएंटची पहिली केस मुंबईत आढळून आली होती. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्येही हा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला आहे. 11 मार्च रोजी गुजरातमधील वडोदरा येथील एका वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. ज्यामध्ये ते व्हेरिएंटचे काही लक्षणे आढळून आले.
ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचली होती आणि एका खासगी हॉटेलमध्ये थांबली होती. काही वेळा नंतर या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होई लागला. असे असतांना या व्यक्तीने तात्काळ कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वृद्ध व्यक्ती देखील 3 लोकांच्या संपर्कात आली होती. या सर्व लोकांची चाचणी देखील करण्यात आली होती मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मुंबईतील एका 50 वर्षीय महिलेला या नवीन व्हेरिएंटची लागण झाली होती. या महिलेमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हते. ही महिला 10 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून परतली होती. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे तज्ज्ञ कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट शोधण्यासाठी नमुन्याच्या जीनोमची सतत क्रमवारी करत आहेत. दरम्यान INSACOG शी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही. सध्या या सर्व व्हेरिएंटची तीव्रता आणि रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याच्या दरावर लक्ष ठेवले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.