आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले:250 कुटुंबांचे स्थलांतर, जीर्ण इमारतींचा धोकादायक यादीतही समावेश नाही

ठाणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रतिकात्मक आहे. - Divya Marathi
फोटो प्रतिकात्मक आहे.

ठाण्यात छताला आणि खांबांना तडे गेल्याने 5 इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 250 कुटुंबे राहत होते.

इमारतींना अचानक तडे

ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही इमारतींचे छत कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबांना धोकादायक इमारतींमधून बाहेर काढले जात आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना शनिवारी तडे गेले. यानंतर अग्निशमन विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतींची पाहणी केली. इमारतींना अचानक तडे का गेले, हे अद्याप कळू शकलेले नाही.

इमारतींची पुन्हा पाहणी करणार

अधिकाऱ्यांनी सांगितले की, तडे गेलेली एक इमारत 1998 मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीचा धोकादायक इमारतींच्या यादीत तिचा समावेश नव्हता. या इमारतींची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील.

कुटुंबीयांसाठी निवाऱ्याची सुविधा नाही

दरम्यान, या इमारतींमधून बाहेर काढण्यात आलेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. नवीन निवाऱ्यासाठी कुटुंबीयांनाच शोधाशोध करावी लागत आहे. अद्यापतरी जीर्ण इमारतींमुळे कोणालाही दुखापत झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...