आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अग्नितांडवाच्या दोन घटना:शीळ फाटा परिसरातील आगीत एकाचा मृत्यू, मुंब्रा येथील शाळेजवळच्या इमारतीतही आग

ठाणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गृह शहर असलेल्या ठाण्यात शुक्रवारी सकाळी अग्नितांडवाच्या दोन घटना घडल्या. यापैकी एका स्फोटाच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मुंब्रा येथे शाळेजवळच्या इमारतीला आग

याविषयी सविस्तर वृत्त असे की, ठाण्याच्या मुंब्रा भागातील एखा खासगी शाळेजवळ असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना सकाळी समोर आली. या इमारतीच्या तळ मजल्याला आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे 4 बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कसल्याही जीवितहानीचे वृत्त मिळाले नाही.

आग लागल्यानंतर घटनास्थळी झालेली गर्दी. (मुंब्रा)
आग लागल्यानंतर घटनास्थळी झालेली गर्दी. (मुंब्रा)

शीळ फाटा येथे एक ठार

दुसरीकडे ठाण्यातीलच शीळ फाटा भागात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर आसपासच्या परिसरात भीषण आग लागली. या घटनेत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याची माहिती मिळाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

शीळ फाटा परिसरातील आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेले अग्निशमन दलाचे बंब
शीळ फाटा परिसरातील आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर दाखल झालेले अग्निशमन दलाचे बंब

ठाणे महापालिकेचे क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अविनाश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी सुमारे साडेसहा वाजता घडली.

ही बातमीही वाचा...

नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा:वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा शक्यता

बातम्या आणखी आहेत...