आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याच्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 2 फेब्रुवारी रोजी समीर वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरु बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली होती. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोगावले यांनी शनिवारी रात्री 8 वाजेयच्या सुमारास कोपरी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला अशी माहिती गोगावले यांनी तक्रारीत दिली आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. वानखेडेंनी आपले वय चुकीचं दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला होता. समीर वानखेडेंच्या नावावर नवी मुंबईतील वाशीमध्ये एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर आरोप केले होते. हे बार आणि रेस्टॉरंट आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर वानखेडेंवर ही कारवाई करण्यात आली आहे. वाशी येथील सतगुरु हॉटेल्सच्या लायसन्समध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.