आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस कोरोना:ठाणे पोलिसातील 417 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण, कोरोनामुळे आतापर्यंत तीन पोलिसांचा मृत्यू

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे पोलिसात कार्यरत असलेल्यांपैकी आतापर्यंत 417 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ठाणे पोलिस प्रवक्त्या सुखदा नारकर यांनी शनिवारी यासंदर्भातील आकडेवारी जारी केली. त्यानुसार, यापैकी 3 पोलिस काँस्टेबल मृत्यूमुखी पावले आहेत. तर 313 कर्मचाऱ्यांना बरे झाल्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर 101 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ठाणे पोलिस व्यतिरिक्त ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत भिवंडी, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरसह बदलापूर सुद्धा येतात. दरम्यान, ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना आपली ड्युटी बजावताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आहे. त्यामुळे, पोलिसांनी अतिरिक्त काळजी घ्यावी असेही यातून सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळातही आपल्या जीवाची परवा न करता पोलिस कर्मचारी ड्युटी बजावत आहेत. अशाच पोलिसांची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली. ऑन ड्युटी असताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 65 लाख रुपयांची मदत घोषित केली. यासोबतच, कोरोनाविरोधी लढ्यात जीवाची आहुती देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आता छताची चिंता करावी लागणार नाही. या काळात ऑन ड्युटी मृत्यूमुखी पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबाला रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत सरकारी घरात राहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...