आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी एका व्यक्तीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याची माहिती देण्यासाठी इमारतीमधील इतर लोक त्या तरुणाच्या घरी गेले, तर त्यांना त्या तरुणाचे वडील आणि आजोबांचा मृतदेह आढळला. त्या दोघांच्याही पोटात चाकू भोसकण्यात आले होते. या घटनेवेळी घरातील केअर टेकर घरातच होता.
प्राथमिक तपासात घरातील केअर टेकर अनंत कांबळने पोलिसांना सांगितले की, त्या तरुणाने आधी आपल्या वडील आणि आजोबांच्या पोटात चाकू भोसकून खून केला. नंतर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. सध्या तिघांचे मृतदेह पोलिसांनी पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, सकाळी 9 वाजता मुलुंड परिसरातील वसंत ऑस्करच्या 'C' विंगमधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 604 मध्ये राहणाऱ्या शार्दुल मांगलने आधी वडील केशव मांगल(50) आणि नंतर आजोबा सुरेश केशव मांगल(84) यांचा खून केला. यानंतर त्याने फ्लॅटच्या बालकनीमधून उडी मारुन आत्महत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.