आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये प्रवास:आरोपी वाधवानने 23 जणांसह केला महाबळेश्वर प्रवास; पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
वाधवान यांच्याकडे असलेले पत्र  - Divya Marathi
वाधवान यांच्याकडे असलेले पत्र 
  • गृहखात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांना प्रवासासाठी पत्र दिल्याचे म्हटले जात आहे

डीएचएफएलचा प्रवर्तक तसेच येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी कपिल व धीरज वाधवानला लाॅकडाऊनमध्ये निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुवारी महाबळेश्वरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथील वाधवानच्या फार्म हाऊसवर पोिलसांना त्याच्या कुटुंबीयांसह २३ जण आढळले.  पोलिस अधिकाऱ्यांनुसार, पुणे अाणि सातारा जिल्हे पूर्णपणे सील असताना वाधवान कुटुंबीय व काही लोक बुधवारी खंडाळ्याहून कारने महाबळेश्वरला गेले. ते फार्म हाऊसमध्ये असल्याचे पोलिसांना कळले. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबाच्या २३ सदस्यांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी कशी मिळाली, याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. जे झाले ते चुकीचेच आहे. याची चौकशी करू, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, गृहखात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांना प्रवासासाठी पत्र दिल्याचे म्हटले जात आहे. अशा प्रकारचे पत्र आपत्कालीन परिस्थितीतच दिले जाते. 

बातम्या आणखी आहेत...